जामनेरात ठाकरे गटातर्फे कपाशीच्या हमी भाव मिळण्यासाठी आंदोलनाचे आयोजन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव न मिळाल्याने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आले. या अनुषंगाने जामनेर येथे उद्धव ठाकरे गट युवासेनातर्फे  जामनेरात सोमवारी २९ मे रोजी “कपाशीची अंत्ययात्रा” काढून आंदोलन करण्यात आले आहे.

 

गेल्या वर्षातील शेतकऱ्यांच्या हंगामाचा कापूस भाव कमी असल्याने घरात पडून आहे. त्यामुळे शेतकरी अर्थीक संकटात सापडला आहे. शिवाय आता काही दिवसानंतर नवीन हंगामीच्या पेरणीचा सुरूवात करण्यात येणार आहे. शासनाच्यावतीने शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव देण्यासाठी उध्दव ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी २९ मे रोजी सकाळी १० वाजता  शहरातील नगरपालिका चौक ते तहसील कार्यालयापर्यंत कपाशीची अंतयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी विविध मागण्यांसाठी सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. सरकारला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांची आंदोलनासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन उद्धव ठाकरे गट युवासेनाचे जिल्हाप्रमुख राहूल चव्हाण यांनी केले आहे.

Protected Content