Home Cities जळगाव जळगावात जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन (व्हिडिओ)

जळगावात जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन (व्हिडिओ)

0
47

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महाराणा प्रताप चौकात क्रांतीसर्य महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

क्रांतीसर्य महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील महाराणा प्रताप चौकात महाराणा पुतळा येथे महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, असा राजा होणे नाही, दुश्मनांना सळो की पळो करून सोडणारे महाराणा प्रताप यांचा इतिहास मोठा आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श आणि प्रेरणा आजच्या समाजाने घेणे आवश्यक आहे. सर्व समाजातील सर्व लोकांनी त्यांचा इतिहास वाचावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त अभिजित बाविस्कर, विलाससिंह पाटील, प्रा. सुरेशसिंह राजपूत, अध्यक्ष, पृथ्वीराज फाउंडेशन, विजयसिंह राजपूत, अतुलसिंह राजपूत, विठ्ठलसिंह मोरे, बी. एच. खंडाळकर आदी उपस्थित होते.02:52 PM

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/755023572194552

 


Protected Content

Play sound