जयंत पाटील यांना ईडीची नोटीस : उद्या होणार चौकशी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीने जयंत पाटील यांना उद्याच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आयएल अँड एफएस प्रकरण पडताळणीसाठी ईडीने जयंत पाटील यांना नोटीस बजावली आहे. ईडीने पाटील यांना उद्याच हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आयएल अँड एफएस प्रकरणात एका व्यक्तीला अनेक कंत्राटं मिळाली होती. त्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा ईडीला संशय आहे. या संशयाची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांना उद्याच ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

 

दरम्यान,  जयंत पाटील यांनी आपल्याला कोणतीही नोटीस आली नसल्याचे प्रतिपादन केले आहे. या  कंपनीच्या व्यवहारांची यापूर्वीच ईडीकडून चौकशी सुरू असून या कंपनीत मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचाही संश आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अरुण कुमार साहा यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही केली होती. याच प्रकरणात आता जयंत पाटील यांना नोटीस बजावली गेल्याची माहिती समोर आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content