छत्रपती शिवाजी नगरातील दाळफळ येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शाखेचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील दाळफळ येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शाखेचे उद्घाटन जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्याहस्ते करण्यात आले. १९ जून रोजी शिवसनेच्या वर्धापनाच्या अनुषंगाने आठवडा आधीपासून विविध उपक्रमांना सुरूवात करण्यात आली.

 

यावेळी सहसंपर्कप्रमुख  गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, समन्वयक अंकुश कोळी, अल्पसंख्यांक आघाडीचे जाकिर पठाण, माजी नगरसेवक संजय राठोड, ज्येष्ठ शिवसैनिक गणेश मोझर, शेषराव वलकर, अंबादास निकम, लक्ष्मण सांगोरे, शंकर बाबा, शाखाप्रमुख-यश उपाध्ये, उपशाखा प्रमुख-सागर बडगुजर, शाखा संघटक-पंकज व्यास, सचिव-सागर उपाध्ये यांच्यासह उत्तम शिंदे, सतीश बिरारी,साबळे काका, श्रीकांत आगळे, गणेश सोनवणे, कामील भाई, भरत कोचुरे, सुमित पंडित, आदित्य कोळी, रामदेव उपाध्ये, खलील भाई, यांच्यासह शिवसैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Protected Content