गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांचे झाले जल्लोषात स्वागत

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवागतांचे स्वागत यावेळी शाळेत करण्यात आले. मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.

 

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

याप्रसंगी करण्यात आले. ढोल ताशाच्या आवाजावर ठेका धरत विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये फुगे तसेच फुले देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. लय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना गोड शिरा देण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी संपूर्ण शाळा फुले पताका तसेच फुग्यांनी सजवण्यात आली.

 

प्रसंगी शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी ,  उपशिक्षक अशोक चौधरी, कल्पना तायडे , योगेश भालेराव , सूर्यकांत पाटील , स्वाती पाटील , तालुका भारंबे , कल्पना पाटील , गायत्री पवार , मंगल गोठवाल , भावना पाटील , देवेंद्र चौधरी ,  सुनील नारखेडे , सुधीर वाणी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content