खळबळजनक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी चार महिन्याची गर्भवती

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लग्न करण्याचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर जबरी अत्याचार करत चार महिन्याची गर्भवती केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एका संशयित तरुणावर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. जानेवारी २०२३ मध्ये अल्पवयीन मुलगी ही घरी असताना इम्रान मुक्तार सय्यद (वय-२२, भुसावळ) याने पीडित मुलीला घरी बोलवून तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध केले, या अत्याचारातून पीडित मुलगी ही ४ महिन्याची गरोदर राहिली. विशेष म्हणजे पीडित मुलीसोबत या तरुणाने सेल्फी फोटो काढून इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली होती. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी इम्रान मुक्तार सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहे.

Protected Content