कारण नसतांना तरूणाला तिघांकडून लोखंडी सळईने मारहाण

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील बीएसएनएल ऑफिसजवळ राहणाऱ्या एका तरुणाला लोखंडी सळईने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुरुवार ४ मे रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रुपेश सुधाकर चौधरी (वय-२२, रा. बीएसएनएल ऑफिस जवळ, धरणगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून सध्या शिक्षण घेत आहे. ३ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रुपेश चौधरी हा घरी असताना त्याला एकाचा फोन आला होता. त्यावेळी त्याला फोनवर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी राकेश दगडू पाटील, हितेश दगडू पाटील दोन्ही रा. हेडगेवार नगर आणि ब्रह्मा कैलास धनगर रा.धनगर गल्ली धरणगाव या तिघांनी रुपेश चौधरी यांच्या घरी येऊन त्याला बेदम मारहाण केली. त्यावेळी रुपेशचे मित्र अनिकेत, निलेश, आकाश आणि राहुल हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनादेखील धक्काबुक्की केली. या लोखंडी सळईने वार केल्याने रुपेश चौधरी यांच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली.  त्याला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गुरुवार ४ मे रोजी रात्री ९ वाजता रुपेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नाना ठाकरे करीत आहे.

Protected Content