काय सांगता ? : नववीच्या विद्यार्थ्याकडे आढळला गावठी कट्टा !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरापासून जवळच असलेल्या अकलूद शिवारातील नामांकीत स्कूलमध्ये नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात गावठी कट्टा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहरापासून जवळच अकलूद शिवारात पोअकलूद शिवारातील नामांकीत स्कूल  आहे. आज सकाळी येथील शिक्षकांनी नियमीतपणे विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली असता नववीच्या विद्यार्थ्याकडे गावठी कट्टा आढळून आला. यामुळे शिक्षकांना धक्का बसला. या संदर्भातील माहिती शाळेच्या प्रशासनाला देण्यात आली.

यानंतर सदर विद्यार्थ्याच्या विरोधात फैजपूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली असून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. एका प्रतिष्ठित शाळेतील विद्यार्थ्याकडे गावठी पिस्तूल आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात पोदार स्कूलच्या प्राचार्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत आपल्या शाळेत हा प्रकार घडल्याचे सांगून पोलीस पुढील चौकशी करत असल्याचे सांगितले.

Protected Content