मुंबई : वृत्तसंस्था । मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएनं गुरुवारी सकाळीच एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी छापा टाकला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.
अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण आणि त्यानंतर घडलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण याची चौकशी एनआयएकडून सुरू आहे. याच संदर्भात एनआयएनं प्रदीप शर्मा यांच्या घरावर सकाळीच छापा टाकला होता. तेव्हापासूच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलं आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेंनतर अटक होणारे प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसातील दुसरे मोठे अधिकारी आहेत.