उसनवारीच्या पैशांच्या वादातून एकाचा खून

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसनवारीने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून एकाचा खून केल्याचा धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील जांभूळ शिवारात घडली आहे. याप्रकरणी एकाला पहूर पोलीसांनी ताब्यात घेतले असून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास विठोबा वडाळे (वय-४५) रा. जांभूळ ता. जामनेर असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास वडाळे हे आपल्या परिवारासह जामनेर तालुक्यातील जांभूळ येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. कैलास यांनी रमेश मोरे रा. वडाळी ता. जामनेर याला उसनवारीने पैसे दिले होते. त्यानंतर कैलास यांनी रमेश यांच्याकडे उपसनवारीचे पैसे मागितले. याचा राग आल्याने रमेश मोरे याने कैलास वडाळे यांचा घातपात करून खून करून फेकून दिले. ही घटना १२ मे रोजी दुपारी ३ वाजता घडली होती. दरम्यान, तेव्हापासून कैलास वडाळे बेपत्ता होते. कैलास यांचा खून रमेश मोरे यानेच केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार पहूर पोलीसांनी कारवाई करत संशयित आरोपी रमेश मोरे याला ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहे.

Protected Content