आशीष देशमुख पुन्हा भारतीय जनता पक्षात दाखल

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉंग्रेसमधून निलंबीत करण्यात आलेले आमदार आशिष देशमुख यांनी आता पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे.

 

कॉंग्रेस, भाजपा पुन्हा कॉंग्रेस असा प्रवास केलेल्या आशीष देशमुख यांनी आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी काल केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती. यावेळी ते म्हटले होते, मी कुठल्याही पदाची मागणी केली नाही. मी कार्यकर्ता म्हणून आणि पक्ष जी जबाबदारी देईल ते करत राहणार आहे. श्रद्धा आणि सबुरीनेच माझी पुढील राजकीय वाटचाल राहील. माझी राजकीय वाटचाल कोण्या एका मतदारसंघासाठी केली नाही. विदर्भाच्या हितासाठी मी काम करणार आहे.

 

आशीष देशमुख यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर तोड डागल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासूनच ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती. यावर आजच्या पक्ष प्रवेशातून शिक्कामोर्तब झाले आहे.

Protected Content