आयएमए वैद्यकीय क्षेत्रातील तरूण डॉक्टरांच्या सदैव पाठीशी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशात डॉक्टरांची कमतरता असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. मात्र सद्यस्थितीला एक लाख डॉक्टर बेरोजगार आहेत. इंडियन मेडीकल असोसिएशन हे स्वयंरोजगाराचे केंद्र असून वैद्यकीय क्षेत्रातील तरूण डॉक्टरांच्या प्रत्येक अडचणीत आयएमए त्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन इंडियन मेडीकल असोसिएशन हेडक्वार्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. असोकन यांनी आज येथे केले.

 

जळगाव इंडियन मेडीकल असोसिएशन आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे डॉ. केतकी हॉल येथे आयोजित हेल्थकेअर कॉनक्‍लेव्ह अर्थात राष्ट्रीय आरोग्य सेवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. असोकन बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला इंडियन मेडीकल असोसिएशन हेडक्वार्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. असोकन यांचे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व आयएमएतर्फे ढोलताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालात स्वागत करण्यात आले. तसेच डॉ. असोकन यांचा आज ६८ वा वाढदिवस असल्याने त्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर डॉ. केतकी हॉल येथे डॉ. आर.व्ही. असोकन यांचे आगमन झाले. मुळचे केरळ येथील असलेले डॉ. असोकन यांचे वारकरी संप्रदायाची प्रचिती देणारे कानडा राजा पंढरीचा या भक्तीगीताने स्वागत करण्यात आले. तसेच सृष्टी सोनपसारे या विद्यार्थीनीने भरतनाट्यम करीत गणेशवंदना सादर केली. याप्रसंगी इंडियन मेडीकल असोसिएशन हेडक्वार्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. असोकन यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, आयएमए सचिव डॉ. तुषार बेंडाळे, जळगाव आयएमएचे आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, आयएमए हेड क्‍वॉटरचे उपाध्यक्ष डॉ. जयेश लेले, आयएमए हेड क्‍वॉटरचे उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, माजी अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर, महाराष्ट्र आयएमचे अध्यक्ष रवींद्र कुटे, आयएमए महाराष्ट्र सचिव डॉ. संतोष कदम, डॉ. मंगेश पाटे, डॉ. सत्येन मंत्री, डॉ. संतोष कुळकर्णी, महाराष्ट्र आयएमए (इले)अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे, आयएमए एमएसएन महाराष्ट्रचे डॉ. अजय साहा, आयएमए एमएसएल महाराष्ट्र चेअरमन डॉ. शिव जोशी, डॉ. वसंत लुंजे, नाशिक आयएमएच्या अध्यक्षा डॉ. स्वप्नांजली कदम, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ.सुहास बोरले, डॉ.सुहास पिंगळे, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. लोंढे, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कैलास वाघ, पीएसएम विभाग प्रमुख डॉ.दिलीप ढेकळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला आयोजन समितीचे सहसमन्वयक डॉ. भरत बोरोले यांनी आयएमएच्या प्रतिज्ञेचे वाचन केले.

 

तरूण डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राचे उज्वल भविष्य – डॉ. असोकन

इंडियन मेडीकल असोसिएशन हेडक्वार्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. असोकन यांनी वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा भव्य परिसर आणि डॉ. उल्हास पाटील यांचा अत्यंत साधेपणा यामुळे मी भारावलो आहे. डॉ. उल्हास पाटील हे वैद्यकीय क्षेत्रासाठी एक रोल मॉडेल असल्याचे गौरवोद‍्गार डॉ. असोकन यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात सरकारकडून जे काही धोरण ठरविले जाते त्यात अनेक विषयांवर सरकारशी चर्चा करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या तरूण डॉक्टरांसाठी त्यांचा सहकारी हाच त्यांचा भाऊ,बहिण असल्याचे कायम लक्षात ठेवावे. प्रत्येक अडचणीत हाच सहकारी तुम्हाला मदत करणारा आहे. वैद्यकीय क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर अनेक संधी उपलब्ध आहेत. देशात एक लाख डॉक्टर जॉबच्या प्रतिक्षेत आहेत. इंडियन मेडीकल असोसिएशन हे स्वयंरोजगार केंद्राचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

डॉ. असोकन यांनी पदानुक्रम आणि वर्चस्व, उद्यमशीलता, वैद्यकीय क्षेत्रातील वारसा, कामाच्या ठिकाणी होणारी हिंसा, वैद्यकीय विद्यार्थी आणि तरूण डॉक्टरांसमोरील आव्हाने यावर मार्गदर्शन केले.तसेच तरूण डॉक्टर्स हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. तुमचे पालक म्हणून आयएमए सदैव तुमच्या पाठीशी असल्याचेही डॉ. असोकन यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. विलास भोळे, आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍न आणि शंकाचेही डॉ. असोकन यांनी निरसन केले.

 

याप्रसंगी डॉ. रवींद्र कुटे यांनीही डॉ. उल्हास पाटील यांच्याविषयी गौरवोद‍्गार काढले. यानंतर ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्क या विषयावर डॉ. जयेश लेले यांनी सादरीकरण केले.  यावेळी डॉ. रामकृष्ण लोंढे, डॉ. दिनेश ठाकरे उपस्थित होते.  द रोल ऑफ मेडिकल काऊंसिलिंग इन मेडिकल एज्युकेशन विषयावर डॉ.शिवकुमार उत्‍तुरे यांनी सादरीकरण केले यावेळी डॉ.सुहास पिंगळे, डॉ.अनिल पाचणेकर उपस्थीत होते. तसेच रिसायलेंस क्‍वॉलिटी टू अ‍ॅक्‍वायर अ‍ॅज अ यंग डॉक्टर या विषयावर डॉ.शिव जोशी यांनी सादरीकरण केले. यावेळी डॉ.अजय साह, डॉ.मिलिंद नाईक उपस्थीत होते.

 

परिषदेच्या प्रास्ताविकातून वैद्यकीय महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी राष्ट्रीय आरोग्य सेवा परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. रागीनी पाटील यांनी तर आभार आयएमए सचिव डॉ.तुषार बेंडाळे यांनी मानले.

 

डॉ. असोकन हे वैद्यकीय क्षेत्राची अमूल्य संपत्ती – डॉ. उल्हास पाटील

परिषदेचे प्रास्ताविक करतांना वैद्यकीय महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, इंडियन मेडीकल असोसिएशन हेडक्वार्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. असोकन हे आयएमएची अमूल्य अशी संपत्ती आहे. देशातील वैद्यकीय क्षेत्राचे धोरण ठरविण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. डॉ. असोकन यांच्या उपस्थितीत ही परिषद होत असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, जळगाव आयएमएचा सामाजिक उपक्रमात नेहमीच उर्त्स्फुत सहभाग राहिला आहे. अडचणीच्या आणि कठीण प्रसंगात जळगाव आयएमए एकजुटीने एकमेकांसाठी उभे राहतात. जळगाव आयएमएमध्ये कधीही खुर्चीसाठी वाद झाले नाहीत ही अभिमानाची बाब असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.

 

वुमन एम्पॉवरमेंट लेक्‍चर सिरीचे उद्घाटन

परिषदेच्या सुरूवातीला वुमन एम्पॉवरमेंय लेक्‍चर सिरीजच्या होर्डींग्जचे प्रकाशन डॉ.आर.व्ही.असोकन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयएमए नाशिक अध्यक्ष डॉ.स्वप्नांजली कदम व डॉ.केतकी पाटील उपस्थीत होते. तसेच आयएमएच्या डिस्काउंटेड मेंबरशीप मोहीमेच्या पोस्टरचेही डॉ. असोकन यांच्यासह डॉ.शिव जोशी व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Protected Content