आम्ही नवाज शरीफ यांचा केक कापला नाही : राऊतांची टिका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे हे मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्यावरून टिका करणार्‍या देवेंद्र फडणवीस यांना खासदार संजय राऊत यांनी टोला मारत पलटवार केला आहे.

 

मुंबईत संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलतांना सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल केला. यात त्यांनी फडणवीस यांना उत्तर दिले. राऊत म्हणाले की, ’कश्मीर हा हिंदुस्थानचा भाग आहे. काश्मीरच्या मेहबुबा मुक्ती यांच्याबरोबर आपण अडीच वर्ष सरकार बनवलं आहे. त्या सरकारमध्ये आपण होतात, त्यांच्या शपथविधीला प्रधानमंत्री स्वतः उपस्थित होते. ’आम्ही नवाब शरीफ यांचा केक कापायला गेलो नाही किंवा त्यांच्या सरकारमध्ये सामील झालो नाही. भविष्यात त्याच्यावर आम्ही चर्चा करू किंवा आज उद्धव ठाकरे त्याच्यावर बोलतील. कदाचित उगाचच तोंडाच्या वाफा दवडू नका. तुमचंच भूत आहे आणि तुमचंच पाप आहे असा टोला त्यांनी मारला.

 

दरम्यानमणिपूरच्या हिंसाचारावर भाष्य करताना राऊत म्हणाले, ’ मणिपूर ज्या प्रकारे पेटले. या भागात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांवरही हल्ले झाले आहेत, तिथे आमदारांची घरे जाळली गेली आहेत. मणिपूर हे गृहमंत्री केंद्र सरकारच्या नियंत्रणात राहिलेलं नाही. अमित शाह हे गृहमंत्री, पोलादी पुरुष असताना देखील ते मणिपूरचा हिंसाचार थांबवू शकले नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

Protected Content