आता चलनातून २ हजाराची नोट बाद होणार !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. आरबीआयने बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवण्याचे आदेश दिले आहे. परंतू असे असले तरी २ हजाराच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध राहतील, असे देखील आरबीआय बँकेने म्हटलं आहे.

भारत सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांची नोट बंद करण्याच निर्णय घेतला होता. त्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला रात्री ८ वाजता संबोधित करताना हा निर्णय जाहीर केला होता. रात्री १२ नंतर ५०० आणि १००० रुपयांचा नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर सरकारने नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. यात ५०० आणि नवीन २ हजार रुपयांची नोट सुरु केली होती.

भारतात यापूर्वी १०० , ५००० आणि १० हजार रुपयांची नोट बंद झाली होती. त्यानंतर ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली होती. आरबीआयने १० हजार रुपयांची नोट १९३८ साली छापली होती. पण जानेवारी १९४६ मध्ये ही नोट बंद करण्यात आली. त्यानंतर १९५४ मध्ये १० हजार रुपयांची नोट चलनात आली. पण १९७८ मध्ये चलनातून हद्दपार करण्यात आली.

१९४६ मध्ये आरबीआयने ५००, १००० आणि १० हजार रुपयांची नोट बंद केली. त्यानंतर १९५४ साली १०००, ५ हजार आणि १० हजार रुपयांची नोट चलनात आली. जानेवारी १९७८ मध्ये बंद करण्यात आल्या. त्यानंतर ५०० आणि १००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या. पण ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर २०१७ मध्ये ५०० आणि २ हजार रुपायांची नोट चलनात आली. यापैकी आता २ हजार रुपायांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Protected Content