अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत केले अपहरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेते तिचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथे अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. रविवार 14 मे रोजी सायंकाळी ६ वाजता अल्पवयीन मुलीचे आई वडील हे घरी नव्हते. घरी एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी फुस लावून अज्ञात कारणासाठी पळवून गेले. आई वडील घरी परतल्यावर अल्पवयीन मुलगी एक घरी दिसली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला असता, ती मिळून आली नाही अखेर दुसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर हे करीत आहेत.

Protected Content