अपार्टमेंट समोरून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील मोहाडी रोड परिसरातील लिलावती अपार्टमेंट समोरून एकाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून दिल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील लीलावती आपारमेंट येथे गंगाप्रसाद विदसेनरा सिंग (वय 55) हे वास्तव्यास आहेत गंगाप्रसाद सिंग यांनी 7 मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांची एम.एच. बी झेड ९९६९ या क्रमकांची दुचाकी ते राहत असलेल्या अपार्टमेंटच्या समोर मोहाडी रस्त्यालगत उभी केली होती दुसऱ्या दिवशी आठ मे रोजी साडेसात वाजेच्या सुमारास उभी केलेली दुचाकी मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने  चार दिवसानंतर गंगाप्रसाद सिंग यांनी शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून 25 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे हे करीत आहेत.

Protected Content