अपघातात दुचाकीस्वार वृद्ध जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील नागोरी चहाच्या दुकानासमोर दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने ६४ वर्षीय वृद्ध जखमी झाले होते. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनकर रतन सोनवणे (वय-६४), रा. न्यू सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २ मे रोजी दुपारी १२ वाजता ते त्यांच्या स्कुटीवरून जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील नागोरी चहा जवळून जात असताना त्यांना भरधाव वेगाने येणारे कंटेनरने स्कुटीला धडक दिली. या धडकेत दिनकर सोनवणे हे जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार घेतल्यानंतर शनिवारी १० जून रोजी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज पवार करीत आहे.

Protected Content