जि.प.सदस्याचा पती असून ‘हु आर यू’ विचारल्यामुळे दांगडो झाला : चंद्रशेखर अत्तरदे (व्हिडीओ)

3ea45776 1c36 497a ba20 385cc156b175

 

जळगाव (प्रतिनिधी) मागील १० दिवसापासून एका कामासंदर्भात सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. परंतू त्यांनी जि.प.सदस्याचा पती असूनही आज मला ‘हु आर यू’ विचारल्यामुळे दांगडो झाल्याची कबुली जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती तथा भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना दिली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, चंद्रशेखर अत्तरदे हे आपली पत्नी जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे यांच्यासोबत कामानिमित्त आज (शनिवार) दुपारी १:३० वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्या दालनात आले होते. यावेळी सीईओ श्री.पाटील आणि चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात एका विषयावरून जोरदार शाब्दीक वाद झाला. त्यानंतर सीईओ यांनी सदस्या पती चंद्रशेखर अत्तरदे यांना ‘हू आर यू’ म्हटले, याचाच राग चंद्रशेखर अत्तरदे यांना आला. त्यामुळे त्यांनी जि.प.भवनात आरडाओरड करत सीईओ यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

 

दरम्यान, ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना सांगितले की, आज मी व माझी पत्नी मागील १० दिवसापासून एका कामासंदर्भात सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांच्याकडे एका कामासंदर्भात पाठपुरावा करत आहोत. आज याच कामासंदर्भात विचारणा केली असता. सीईओ पाटील यांनी उलट मला ‘हु आर यू’ असे विचारले म्हणून आज दांगडो झाला,अशी कबुली चंद्रशेखर दिली आहे.

 

Protected Content