जिल्हापेठ युवक मित्र मंडळाचा “सुवर्ण मंदिर वेल्लोर तामिळनाडू”च्या देखाव्याला प्रतिसाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गांधीनगर मधील जिल्हा पेठ युवक मित्र मंडळ चा यावर्षीचा देखावा सुवर्ण मंदिर वेल्लोर तामिळनाडू ची प्रतिकृती उभारली असून विलोभनीय गणेशाचे मूर्ती हे आकर्षण आहे.

शहरातील जिल्हा पेठ युवक मित्र मंडळ गांधीनगर परिसर हे मंडळ दरवर्षी आध्यात्मिक व सामाजिक देखाव्यांवर भर देत असून मंडळाचे हे ३३वे वर्षे असून मागील 33 वर्षापासून अविरतपणे जिल्हा पेठ युवक मित्र मंडळ नाविन्यपूर्ण देखावे सजीवारास धार्मिक व ऐतिहासिक स्थळांची माहिती यामध्ये प्रामुख्याने महालक्ष्मी मंदिर प्रतिकृती कोल्हापूर संत गजानन महाराज मंदिर शेगाव, इस्कॉन मंदिर सिद्धिविनायक देवस्थान मुंबई, मंगेशी मंदिर गोवा तुळजाभवानी माता मंदिर, तुळजापूर गाणगापूर येथील दत्त मंदिराची प्रतिकृती यासह अनेक समाज योगी उपक्रम नेहमी राबवले असून मागील अनेक वर्षापासून अविरतपणे मंडळाची सेवा सुरू आहे.

या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश देशमुख व नारायण खडके हे असून यंदाच्या वर्षी अध्यक्षपदी दीपक माळी तर उपाध्यक्ष विक्की सैंदाणे तर सचिव म्हणून गणेश कापडे हे काम करत आहे. तर सदस्य म्हणून देवेश माळी, सागर विसपुते, प्रमोद सोनी, मयूर वाघ, देवेंद्र मराठे, हरीश नारखेडे, अमोल पाटील, विजय देशमुख, सुनील सपके, उदय वराडे, मयूर सैंदाणे, सल्लागार कैलास पाटील, धर्मेंद्र चंदनकर, दीपक वाणी, ईश्वर राजपूत, अभय सोमाणी, महेश तळेले, शंकर जवळे, प्रदीप झोपे यांची निवड करण्यात आली आहे.

Protected Content