जिल्हा परिषद पं.स. असोसिएशनचे राज्य पदाधिकाऱ्यांचे खा. शरद पवारांना साकडे

यावल प्रतिनिधी । बारामती येथे खासदार शरदचंद्र पवार आणि खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे राज्य पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या खासदार शरद पवार यांना या वेळी प्रामुख्याने संघटनेच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

त्याच बरोबर संघटनेचा पुरस्कार वितरण सोहळा २०२१या कार्यक्रमाच्या करिता अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्यासाठी पत्र देऊन विनंती करण्यात आली. अगदी मोठ्या मनाने दिलखुलास वातावरणामध्ये चर्चा होऊन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे पवार यांनी मान्य केले. राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या क्षेत्रात कार्य करीत सर्व सदस्यांना काम करत असताना येणाऱ्या समस्या अडचणी लवकरच शासन दरबारी सचिव पातळीवर बैठक लावून सोडविण्याचे सुतोवाच खासदार पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

उपस्थित संघटनेचे पदाधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने कैलास गोरे पाटील (संस्थापक अध्यक्ष ), उदय बने (प्रदेश कार्याध्यक्ष ), जय जाधव ( राज्य उपाध्यक्ष ), सुभाष घरत (राज्य सरचिटणीस ), सुभाष पवार ( ठाणे राज्य उपाध्यक्ष ),  रणजीत शिवतारे (उपाध्यक्ष पुणे  जिल्हा परिषद ), प्रमोद काकडे (सह अध्यक्ष निवड समिती ),  शरद पाटील (अध्यक्ष निवड समिती ), कुमारी अमृताताई पवार (महिला कार्याध्यक्ष ) , पांडुरंग पवार (पुणे जिल्हाध्यक्ष ), प्रताप पवार (राज्य उपाध्यक्ष ), अरुण बालटे (सांगली जिल्हा अध्यक्ष ),  नितीन नकाते (सोलापूर जिल्हाध्यक्ष ), भारत शिंदे राज्य उपाध्यक्ष, नाना देवकते (बारामती पुणे जिल्हा परिषद ), शरद पवार यांना संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले.

नोव्हेंबर मध्ये संघटनेच्या वतीने पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांना काम करत असताना तांत्रिक व प्रशासकीय अडचणी निर्माण होतात अशा विविध अडचणी सोडवण्यासाठी खा.पवार यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश करण्यात आला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांना असणारे तुटपुंजे मानधन यामध्ये वाढ करावी. प्रत्येक सदस्यांना गट आणि गण यामध्ये सुधारणा करण्यासाठी स्थानिक विकास निधी देण्यात यावा. पूर्वी जिल्हा परिषदेकडे असणारे कृषी योजना बंद करण्यात आले आहेत.

या पूर्ववत सुरू कराव्या. राज्यातील सर्व जिल्हा परिषद यांची स्थावर मालमत्ता विकसित करण्यात यावी. विधान परिषद मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ऊन निवडण्यात येणारे आमदार हे प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदारच असावे. राज्यातील सर्व पंचायत समिती सदस्य यांना विधान परिषदेसाठी मतदानाचा अधिकार मिळावा त्याचबरोबर नगर विकास मंत्रालय यांनी स्वीकारलेल्या २०२१ जनगणना नुसार ग्रामीण विकास मंत्रालयाने देखील दहा ते १५ टक्के सदस्य संख्या वाढ करावी. अशा अनेक मागण्यांचे निवेदन खा. पवार यांना संघटनेच्यावतीने देण्यात आले. लवकरच ग्रामीण विकास मंत्री आणि मुख्यमंत्री यांचे सोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात येईल. असे आश्वासन देण्यात आले . पवार यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या वेळेबद्दल संघटनेचे सर्व पदाधिकारी आनंदी झाले असल्याची माहीती जिल्हा परिषद  प .स . सदस्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा परिषदचे  गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी सांगीतले .

 

Protected Content