Home क्राईम जिल्हा दुध संघ अपहार : अटकेतील संशयितांचा जामीन मंजूर

जिल्हा दुध संघ अपहार : अटकेतील संशयितांचा जामीन मंजूर


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरणात अटकेतील संशयितांना जळगाव जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता जामीन मंजूर केला आहे. सोमवार, शनिवार पोलीस स्थानकात हजेरी आणि दुध संघाच्या आवारात आरोपपत्र दाखल होईपर्यंत जाता येणार नाही, या अटीशर्थींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा दूध संघात बेकायदेशीरपणे स्निग्ध पदार्थ (स्पॉइल्ड फॅट) बनवल्याचा प्रकरणात सहा संशयितांना अटक करण्यात आली होती. सुरुवातील पोलीस कोठडी मिळाल्यानंतर संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या सर्व संशयितांनी मंगळवारी जामिनासाठी अर्ज केले होते. त्यावर २४ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर शुक्रवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता कामकाज झाल्यानंतर अटकेतील मनोज लिमये, हरी पाटील, किशोर पाटील, अनिल अग्रवाल, रवी अग्रवाल व चंद्रकांत पाटील या सहा जणांना कोर्टाने अटीशर्थींवर न्यायमुर्ती आर.जे.खंडारे यांनी जामीन मंजूर केला.

संशयितांना दर सोमवार, शनिवार पोलीस स्थानकात हजेरी आणि दुध संघाच्या आवारात आरोपपत्र दाखल होईपर्यंत जाता येणार नाही. साक्षीदारांवर दबाव आणू नये, या अटी कोर्टाने घालून दिल्या आहेत.


Protected Content

Play sound