Home Cities अमळनेर युवा श्रमसंस्कार छावणीचा समारोप

युवा श्रमसंस्कार छावणीचा समारोप

0
61

ajinkya bhosle in amalner

अमळनेर प्रतिनिधी । येथील सानेगुरुजी कर्मभुमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या अकराव्या युवा श्रमसंस्कार छावणीचा नुकताच समारोप करण्यात आला.

समारोपाच्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून युवा नाट्यकलावंत अजिंक्य भोसले उपस्थिती होते. त्यांनी युवांसोबत संवाद साधतांना नाट्य आणि सिनेमा क्षेत्रात काम करतांना प्रचंड मेहनत, सातत्य, संघर्षाची गरज असलयाचे प्रतिपादन केले. याशिवाय त्यांनी युवकांच्या शंकांचे निरसन केले. यासोबत अविनाश पाटील यांनी मुलांनी ईथुन जातांना समतेच्या विचारांची प्रेरणा व मानवतेचे मुल्य मनात घेऊन जा.व ती व्यक्तीगत आयुष्याबरोबरच सार्वजनिक आयुष्यात रूजवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. दर्शना पवार यांच्यासह डाँ. प्राचार्य अरविंद सराफ, चेतन सोनार व रमेश दाणे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रम चे सुत्रसंचालन शुभम पवार व राहुल भोई यांनी केले. प्रास्ताविक छावणी प्रमुख श्‍वेता पाटील यांनी केले.

या आगळ्यावेगळ्या समारोपाच्या वेळी छावणीतील सहभागी युवक युवतींमधील त्यांनी निवडलेले गटप्रमुख पायल बारी ,सोनालिका सोनवणे ,दिनेश पाटील, रोहित पाटील, भगवान अहीरे, कल्पेश सोनवणे,शितल चौधरी,शिवानी आहेर, हे युवक युवती उपस्थित होते.

छावणी यशस्वी होण्यासाठी प्रथमेश कोठावदे, चेतन भोई,राहुल भोई, कोमल गायकवाड, प्रदिप पाटील, निकीता पाटील, दिपक पाटील, मंगेश लोहार, रेणुका अजमेर, भाग्येश पाटील, ऋषीकेश, किशोर महाजन, जगदीश पाटील, लकी पवार ,रोहिणी धनगर,सोनली सोनवणे, तोषीत पाटील, नेहा पाटील, दर्शना पाटील, आकाश चौधरी, रोहित शिंपी, अक्षय पाटील, परेश पाटील, वैष्णवी गिरासे यांनी परीश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound