Home Cities जळगाव युवासेनेचे सिद्धेश शिंदे व दिपक दातीर जिल्हा दौऱ्यावर

युवासेनेचे सिद्धेश शिंदे व दिपक दातीर जिल्हा दौऱ्यावर


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । होऊ घतलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या दृष्टीने शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेना तथा युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या आदेशाने युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे, दिपक दातीर, प्रियंका जोशी, युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया हे शुक्रवार 18 ऑक्टोबर 2024 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

युवासेनेचा मेळावा सकाळी 10 वा. चाळीसगाव, दुपारी 12 वा. भडगाव, सायं. 6 वा जळगाव शहर येथे आयोजित करण्यात आला आहे. युवासैनिकांचे मेळावे, पदाधिकारी बैठका आदि कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने युवासेनेने सक्रीय होऊन उमेदवार निवडून आणण्यासाठी निवडणूक व्यवस्थापन, प्रचार यंत्रणा, बुथ व्यवस्थापन इ. विषयात सक्रीय सहभाग घ्यावा हा या दौऱ्यामागील उद्देश आहे.


Protected Content

Play sound