जळगाव, प्रतिनिधी | येथील युवाशक्ती फाउंडेशनची गणेशोत्सवासाठी नुकतीच कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. उत्सव अध्यक्षपदी संदीप सूर्यवंशी, कार्याध्यक्ष म्हणून तेजस दुसाने तर सचिव म्हणून पवन माळी यांची निवड करण्यात आली.
युवाशक्ती व भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनतर्फे गेल्या १० वर्षांपासून काव्यरत्नावली चौकात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षीचे नियोजन व कार्यकारिणी निवड करण्यासाठी गिरीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, सचिव अमित जगताप, अध्यक्ष मनजीत जांगीड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. फौंडेशनतर्फे या वर्षी भारतीय सैन्य दलाच्याविषयी देखावा साकार करण्यात येणार आहे. थलसेना, वायुसेना, नौसेना यांचे कार्य, त्यांचा इतिहास, त्यांचे शौर्य याविषयी नागरिकांना माहिती मिळणार आहे. सैन्य दलामध्ये अधिकारी,सैनिक या पदांवर जाण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा, चाचणी आदींची माहिती युवकांना गणेशोत्सव काळात दिली जाणार आहे. या क्षेत्रात तरुणांनी प्रवेश करून देशसेवा करावी हा उद्देश ठेवण्यात आला आहे.
उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष-प्रशांत वाणी, शिवम महाजन, सहसचिव-विनोद सैनी, सहकार्याध्यक्ष-भवानी अग्रवाल, सरचिटणीस- सौरभ कुलकर्णी,आकाश धनगर, खजिनदार-पियुष हसवाल, सहखजिनदार-विपीन कावडीया, पूजाविधी प्रमुख- पियुष तिवारी, तृषान्त तिवारी, मिरवणूक प्रमुख- राहुल चव्हाण, समीर कावडीया, मिरवणूक उपप्रमुख- आकाश कांबळे, करण शाह, सजावट प्रमुख- दीपेश फिरके, नवल गोपाळ, प्रसिद्धी प्रमुख- तेजस जोशी,रघुनाथ राठोड, सभासद प्रमुख- मयूर जाधव, सागर पाटील यांचा समावेश आहे.तसेच सदस्यपदी तेजस श्रीश्रीमाळ, प्रज्वल चोरडिया, भूषण सोनवणे, अमोल गोपाळ, जितेंद्र जैन, हितेश अग्रवाल, रोहित सोनार, संकेत छाजेड, हितेश सेठिया, जिनल श्रीश्रीमाळ, तेजस वांद्रे, गणेश ओतारी, सागर जगताप, सूरज बेंडाळे, प्रीतम पाटील, मोहित शर्मा, पृथ्वी मैनपुरी, दीक्षांत जाधव, धनराज धुमाळ, जंगलू गवळी, करण जांगीड, संकेत लुणिया, प्रतीक पांडे, प्रीतम नारखेडे, यश चोरडिया, अभिनंदन जैन, गणेश देशमुख, जयेश पवार, राहुल शर्मा,जितेंद्र अत्तरदे, महेश भालेराव, विकास अत्तरदे, पवन भालेराव, महेंद्र शिंपी, मिलिंद पाटील, लेखन उपाध्याय, सौरभ चतुर्वेदी, वैभव पाटील, अमोल सोनावणे, सागर तायडे, कौस्तुभ वाघ, प्रतीक कोटेचा, ज्ञानेश्वर बावसकर, स्वप्नील काशीद, गौरव बर्डे, हर्षल तेली, अनिमेश मुंदडा, भूषण मंगळे, हर्षल भोलाणे, गौरव सोनवणे, भूषण जगताप, शुभम पाटील इत्यादींचा समावेश आहे.