यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मनवेल दगडी येथील ४० वर्षीय तरूणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश विक्रम कोळी (वय-४०) हे आपल्या परिवारात वास्तव्याला होते. १ जुलै रोजी रात्री त्यांनी जेवणे केले व झोपले. त्यानंतर त्यांनी मध्यरात्री राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. २ जुलै रोजी सकाळी हा प्रकार समोर आला. त्यांना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी पोलीस पाटील जीवन कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व वडील असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ सिकंदर तडवी करीत आहे.