जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील नवीन जोशी कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी 29 डिसेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता घडली आहे या संदर्भात रात्री दहा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, मानस भूषण जोशी (वय 22 रा. नवीन जोशी कॉलनी जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. सोमवारी 29 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजता त्यांनी त्यांच्या कंपाउंड मध्ये लावलेली दुचाकी क्रमांक (एमएच 19 इ एच 1970) ही पार्किंगला लावली होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने पार्किंगला लावलेली ही दुचाकी पेटवून दिली. त्यामुळे दुचाकी जळून खाक झाली आहे. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर मानस जोशी यांनी रात्री 10 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे




