भुसावळ प्रतिनिधी । येथील रेल्वे स्थानक परिसरात गावठी कट्टा बाळगणार्या युवकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आज दि. ३१ मार्च रोजी रात्री २२:०० वा.सुमारास भुसावळ शहरात रेल्वे स्टेशन परीसरात गार्ड लाईन जवळील चर्च जवळ एक इसम हा त्याच्यासोबत विना परवाना गावठी कट्टा बागळुन फिरत असल्याची गुप्त माहीती मिळाली होती. यामुळे पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले व अप्पर अधिक्षक लोहीत मतानी, उप.पो.अधिकारी गजानन राठोड तसेच निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. यामध्ये बाजारपेठ पोलीस स्थानकाचे सहा.फौ. अंबादास पाथरवट, तस्लिम पठाण पो.ना.दिपक जाधव पो.काँ निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, कृष्णा देशमुख, राहुल चौधरी यांचा समावेश होता. त्यांनी संबंधीताला ताब्यात घेतले व त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विकास उर्फ ( विक्की ) विलास राजपुत वय -३२ रा.जुनी जिन गामाडीया प्रेस जवळ भुसावळ असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला डाव्या बाजुस गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस मिळुन आले. याबाबत बाजारपेठ पोलीसस्थानकात भाग ६ गुरनं आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्हयाचा तपास पो.हे.काँ माणिक सपकाळे करीत आहे.