बोदवड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्त्या

32647912 this is a vector illustration of hanged man silhouette

बोदवड, प्रतिनिधी | येथे कालरात्री एका तरुणाने आपल्या संभाजी नगरातील राहत्या घरी रात्री १२ :३० च्या सुमारास छताच्या लाकडी खांबाला साडीने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली.

 

अधिक माहिती अशी की, दत्तु तुळशीराम पाटील (वय ३४) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची खबर त्याचा मोठाभाऊ शांताराम तुळशीराम पाटील (वय ३६) याने येथील पो.स्टे.ला दिल्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून पुढील तपास पो.कॉ. कालीचरन सुरेश बिऱ्हाडे करीत आहेत.

Protected Content