जुन्या वादातून तरुणावर चाकूहल्ला; तीन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळ असलेल्या गणपती मंदिराजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला चाकूने वार करून पाठीला दुखापत केली आहे तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना २२ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता घडली. या संदर्भात रविवारी २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित हेमंत गुजर वय १८, रा.मयूर कॉलनी पिंप्राळा हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान शनिवारी २२ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता मोहित हा शहरातील बजरंग बोगद्याजवळ असलेल्या गणपती मंदिरासमोर जात असताना संशयित आरोपी गणेश गोपाळ मराठे याने त्याच्या इतर दोन अनोळखी साथीदारांसोबत रस्ता अडून जुन्या भांडणाच्या कारणावरून मोहित याला याच्यावर चाकूने वार करून जखमी केले. तसेच इतर दोघांनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. या संदर्भात रविवारी मोहित गुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा संशयित आरोपी गणेश मराठे रा. मयूर कॉलनी जळगाव आणि याच्यासोबत असलेले दोन अनोळखी व्यक्ती यांचे विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने संदर्भात पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर करीत आहे.

<p>Protected Content</p>