यावल प्रतिनिधी । तरुणांनी नोकरीचा शोध घेत असतांना केवळ निराश न होता स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे. व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून नाविन्यपूर्ण तसेच वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी त्यांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी केले. ते यावल येथे ग्राहक सेवा केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावल येथील बसस्थानकासमोर पुष्प सेल्स अँड ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातील अजय भारंबे व उज्वल कानडे या दोन तरूणांनी ग्राहक सेवा केंद सुरू केले. यात नागरीकांना भारतीय स्टेट बँकसह शासकीय विविध योजनांची सेवा देण्याचे नियोजन केले आहे. तेव्हा या व्यवसायाचे सोमवारी एका छोटेखानी कार्यक्रम औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद नेमाडे होते. तर नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते उद्घाटक करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष हेमराज फेगडे, डॉ. गौरव धांडे, व्यंकटेश बारी, रामेश्वर बारी, स्नेहल फिरके, रितेश बारी, मानोज बारी, विशाल फेगडे, सांगर इंगळे, भोजराज ढाके, निर्मल चोपडे सह मान्यवरांची उपस्थिती होती.