
रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर येथे आज युवासेनेच्या वतीने आयोजित आढावा बैठक उत्साहात पार पडली. युवासेना अधिक बळकट, प्रभावी व स्थानिक पातळीवर जनतेच्या समस्या सोडवणारी संघटना बनावी, या हेतूने झालेल्या बैठकीत कार्यपद्धती, आगामी योजना आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली.

ही बैठक आमदार चंद्रकांत भाऊ पाटील व युवासेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये रावेर विधानसभा क्षेत्रातील युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बैठकीत विविध योजनांचा आढावा घेत, पुढील राजकीय व सामाजिक कामकाजाची दिशा निश्चित करण्यात आली.
बैठकीस युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण पंडित, रावेर विधानसभा क्षेत्रप्रमुख कुणाल भाऊ बागरे, डॉ. दीपक पाटील, तालुका प्रमुख शुभम भाऊ चौधरी, उपतालुकाप्रमुख ऋषिकेश पंडित, ‘लाडकी बहीण योजना’ तालुका अध्यक्ष राहुल पाटील (गुरुजी), सावदा शहर प्रमुख मनीष भंगाळे यांच्यासह अनेक युवा पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत बैठक अधिक प्रभावी ठरली.
कार्यक्रमात युवासेनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा, नव्या योजनांची अंमलबजावणी, आणि सामाजिक कार्यामध्ये सहभाग वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच स्थानिक तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करून त्यांना संघटनेत सक्रिय करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यासोबतच डिजिटल माध्यमांचा वापर, संवाद वाढविणे आणि विविध गावांत युवासेनेची पकड वाढविण्याचे नियोजनही बैठकीत ठरवण्यात आले.
या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन संघटनेच्या भविष्यातील वाटचालीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट करत, एकसंघपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. रावेर तालुक्यातील तरुणाईला दिशा देण्याचे कार्य युवासेनेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवले जाईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.



