रावेर, प्रतिनिधी | शहरातील एका युवकाने निंभोरासिम येथे तापी नदीत उडी घेऊन आत्महत्त्या करण्याचा प्रर्यत्न केल्याची घटना आज (दि.१७) दुपारी २.०० च्या सुमारास घडली. सुदैवाने जागेवर मासेमारीचा व्यवसाय करणारे कोळी बांधव तिथे उपस्थित असल्याने त्यांनी त्याचे प्राण वाचविले.
या बाबत अधिक वृत्त असे की, शहरातील टायगर वेल्डिंगवाले शेख नूर मोहम्मद यांचा २३ वर्षीय विवाहित मुलगा शेख मुजाहिद याने आज दुपारच्या सुमारास तालुक्यातील निभोरासिम येथे तापी नदीच्या पुलावरुन उडी घेवून आत्महत्त्येचा प्रर्यत्न केला. सुदैवाने त्याचवेळी मासेमारीचा व्यवसाय करणारे काही जण पुलावर होते त्यांनी क्षणाचा विलंब न करता त्याच्या पाठोपाठ नदीत उडी घेऊन त्याचे प्राण वाचविले. त्याला रुग्णवाहीकेद्वारे येथील एका खाजगी रुणालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या उपचार सुरु आहेत.