जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शेळीपालन करुन कुटुंबाला हातभार लावणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना सोमवारी १७ मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील दापोरा येथे विजय चव्हाण हा तरुण वास्तव्यास होता. शेळी पालन करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता. विजय याचे काही वर्षांपुर्वी लग्न झाले होते, मात्र ते दाम्पत्य विभक्त राहत होते. सोमवार १७ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास दापोरा शिवारातील शिवलवनजवळ रेल्वे रुळ ओलांडत असतांना रेल्वेची धडक लागल्याने विजय चव्हाण याचा मृत्यू झाला. दरम्यान, लोकोपायलट यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह तात्काळ जिल्हा रुग्णालयता आणला. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विजय चव्हाण याच्या पश्चात आई, दोन भाऊ वहिनी असा परिवार आहे.