वीजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी येथील 18 वर्षीय तरुणाला विजेच्या धक्का लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गौरव संतोष झांबरे (वय-१८, रा. पारंबी ता.मुक्ताईनगर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

१ जुलै रोजी दुपारी १२  वाजता गौरव झांबरे याला विजेच्या धक्का लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला प्राथमिक उपचार घेण्यासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.  ही नोंद मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. याठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.  या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष चौधरी करीत आहे.

Protected Content