जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते औरंगाबाद रोडवर असलेल्या मानराज शोरूम जवळ पायी जाणाऱ्या तरुणाचा दुचाकीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी १० सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजता घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर महादू पगारे (वय-30, रा. वरखेडा ता.चाळीसगाव ह.मु.उमाळा ता.जि.जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या सात ते आठ वर्षांपासून ज्ञानेश्वर पंगारे हा जळगाव तालुक्यातील उमाळा येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. एमआयडीसी परिसरात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. रविवारी १० सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कामावरून ज्ञानेश्वर पगारे हा घरी जात असताना जळगाव ते औरंगाबाद रस्त्यावरील मानराज शोरूम जवळ दुचाकी (एमएच १९ डिके ४७०३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकी धारक जीवन त्र्यंबक जाधव रा. कुसुंबा तालुका जिल्हा जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहे.