Home क्राईम ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून तरुणाचा मृत्यू


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सालबर्डी शिवारात ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सर्वेश प्रकाश फिरके (वय २५, रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश लक्ष्मण झोपे यांच्या शेतात ही घटना घडली. सर्वेश फिरके हे ट्रॅक्टरच्या मागील मोठ्या चाकाखाली दबलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळून आले. त्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढले.

गंभीर जखमी अवस्थेत सर्वेश फिरके यांना मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप वानखेडे करीत आहेत. या घटनेमुळे सालबर्डी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound