Home क्राईम बसच्या दरवाजातून पडून प्रवासी ठार

बसच्या दरवाजातून पडून प्रवासी ठार

0
34

यावल प्रतिनिधी । येथून भुसावळकडे जाणार्‍या बसच्या दरवाजातून खाली पडल्याने एक प्रवासी ठार झाल्याची घटना शहराजवळ घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एमएच२० बीएल १६४१ क्रमांकाची बस पावणेनऊ वाजता यावलहून भुसावळकडे निघाली. यात बंटी गुलाबचंद डोलतानी (रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) हा प्रवासीदेखील बसला होता. गाडीत गर्दी असल्यामुळे बंटी दरवाजाजवळ उभा होता. शहरातून जाणार्‍या वळणावर बसचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे तो रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, उपचार सुरू असतांना बंटी डोलतानी याचे प्राणोत्क्रमण झाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound