वरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील पेट्रोल पंपामागील वीट भट्ट्याजवळ शिवीगाळ करण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून एका तरुणाला पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना गुरूवारी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मनीष रघुनाथ वाडे (वय ३६, व्यवसाय- ट्रॅक्टर चालक, रा. सिद्धेश्वर नगर) हे गुरूवारी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपाच्या पाठीमागे उभा होता. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले संशयित आरोपी राजू चौधरी, गौरव चौधरी, अमोल चौधरी, रितेश चौधरी आणि समाधान चौधरी (सर्व रा. वरणगाव) यांनी मनीष वाडे सोबत वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ केली. आणि मारहाण केली. एवढेच नव्हे, तर ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी जिवे मारण्याची धमकीही यावेळी देण्यात आली.

याप्रकरणी मनीष वाडे यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून याबाबत तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी राजू चौधरी, गौरव चौधरी, अमोल चौधरी, रितेश चौधरी आणि समाधान चौधरी यांच्याविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



