Home क्राईम तरूणावर धारदार शस्त्राने वार ; चौघांवर गुन्हा दाखल !

तरूणावर धारदार शस्त्राने वार ; चौघांवर गुन्हा दाखल !

0
200

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरी परतणाऱ्या संतोष अशोक पवार (वय २५, रा. नाथवाडा) यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना नाथवाड्यातील भैरवनाथ मंदिराजवळ घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी जवळील नाथवाडा परिसरात संतोष पवार हे वास्तव्यास आहे. ते दि. १४ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास (एमएच ५०, आर ९२३२) क्रमांकाच्या दुचाकीने भैरवनाथ मंदिराजवळून घरी जात होते. यावेळी संशयित हितेश गायकवाडसह त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी पवार यांची दुचाकी अडविली. त्यानंतर काहीही कारण नसतांना त्यांनी संतोष पवार यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी हितेश गायकवाड याने त्याच्या हातातील लोखंडी दांडक्याने पवार यांच्या पाठीवर वार केले. तर त्याच्या मित्राने धारदार शस्त्राने त्यांच्या हातावर वार करीत गंभीर जखमी केले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर संतोष पवार यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound