Home क्राईम वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणारून तरूणावर प्राणघातक हल्ला

वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणारून तरूणावर प्राणघातक हल्ला

0
116

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदे गावातील मातोश्री नास्ता सेंटरजवळ वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरूणाला चार जणांनी धारदार वस्तू आणि लोखंडी रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वावडदे गावातून लोकेश धनसिंग पाटील वय २६ रा.दहीगाव ता. पाचोरा दुचाकीने सोमवारी २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घरी जात होता. त्यावेळी रस्त्यावरील मातोश्री नास्ता सेंटर दुकानासमोर लोकेश पाटील याची दुचाकी आडविली. वाहनाला कट का मारला या कारवरून संशयित आरोपी बंटी उर्फ दिपक पाटील, हरीष पाटील दोन्ही रा. रायसोनी नगर जळगाव, करण पाटील आणि एक अनोळखी यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर एकाने धारदार वस्तू आणि लोखंडी रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर लोकेश पाटील याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ समाधान टाहाकळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound