Home क्राईम दुचाकी अपघातात आई-वडिलांसह तरुण जखमी !

दुचाकी अपघातात आई-वडिलांसह तरुण जखमी !

0
118


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या तरसोद फाट्याजवळ भुसावळकडे जात असलेल्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने कट मारल्याने झालेल्या अपघातात तरूणासह त्याचे आईवडील हे जखमी झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. याप्रकरणी बुधवारी १० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकश राजेश पाटील वय २९ रा. पिंपरी भोजना ता.मुक्ताईनगर हा तरूण कामाच्या निमित्ताने २४ नोव्हेंबर रोजी त्याचे आईवडीलांसोबत खासगी काम आटोपून दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीसी ७७३९) ने भुसावळकडे जात होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तरसोद फाट्याजवळून जात असतांना त्यांच्या दुचाकीला दुसरी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीझेड ४३७८) ने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे आकाश पाटील याच्यासह त्याचे आईवडील हे तिघेजण जखमी झाले. अपघात झाल्यानंतर कट मारणारा दुचाकीस्वार हा न थांबता दुचाकीने पळ काढला. याप्रकरणी अखेर चौकशी अंती बुधवारी १० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound