बुलडाणा – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोल्हापूर ते सालईबनपर्यंत मायभू सेवायात्रा आयोजित करण्यात आली होती. या सेवायात्रेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो तरुणांनी सहभागी होत आपल्या कृतीतून श्रमदानाचे महत्त्व सांगितले.
सध्या सर्वत्र उन्हाचा पारा उच्चांक गाठत आहे बुलढाणा जिल्हा उष्ण जिल्हा म्हणून ओळखला जातो. ४३ डिग्री सें.पर्यंत उन्हाचा पारा आग ओकत असताना पश्चिम महाराष्ट्रातील १०० पेक्षा जास्त तरुणांच्या चमूने श्रमदानातून एक आदर्श समोर ठेवला आहे.
सातपुड्याच्या पर्वतरांगेत रखरखत्या उन्हात ‘श्रमयोगींचा श्रमोत्सव !
४३ अंश सेल्सीअस तापमान दुपारच्या रखरखत्या उन्हाची किंचितही तमा न बाळगता शेकडो श्रमयोगीनी अनोखी धुळवड साजरी केली. असे म्हणावे लागेल सातपुड्याची माती लावत कपाळी, घामांच्या धारांच्या श्रमोत्सवात अवघी तरूणाई न्हाली. घारेवाडी (कराड) येथील शिवम प्रतिष्ठानचे प्रणेते इंद्रजीत देशमुख (काकाजी) यांच्या पुढाकारात दि.१८ ते २० मार्च या कालावधीत कोल्हापूर ते सालईबनपर्यंत मायभू सेवायात्रा आयोजित करण्यात आली होती. या सेवायात्रेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो तरूण सहभागी झालेत.
पर्यावरण रक्षणाला केंद्रस्थानी ठेवत पूरक उपक्रम
यात्रेतील श्रमयोगी सालईबनात शिवम बंधारा आणि सलग समतल चर (सीसीटी) बंधारा यांची निर्मिती करीत आहेत. त्यांना सालईबन मित्र मंडळ आणि आबालवृध्दांसह आदिवासींची साथ असून सातपुड्याचं हिरवं स्वप्नंफुलविण्यासाठी ‘तरूणाई गत सहा वर्षांपासून सातत्याने झटत आहे. पर्यावरण रक्षणाला केंद्रस्थानी ठेवत पूरक उपक्रम राबविले जाताहेत. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ज्येष्ठ सर्वोदयी नेते जयवंत मठकर, तरूणाईचे मार्गदर्शक नरेंद्र लांजेवार, शिवम प्रतिष्ठाणचे यशवंत चौगुले (कोल्हापूर) आणि सर्जेराव लावंड (कराड) यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.
रंगोत्सवाला ‘शिवम’ बंधाऱ्याची निर्मिती
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्य. अधिकारी तथा शिवम प्रतिष्ठानचे प्रणेते इंद्रजित देशमुख यांच्या नेतृत्वात सालईबन येथे ४ लक्ष ११ हजार ७५० घ.मी. पाणी मावेल असा शिवम बंधारा आणि ४०.५ घ.मी. पाणी मावेल इतका सलग समतल चर (सीसीटी) खोदण्यात आलेत.
शांती शिल्पांवर सामुदायिक प्रार्थना
महात्मा गांधीच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त सालईबनात महात्मा गांधी यांचे २५ फूट उंचीचे जागतिक दर्जाच्या शांती शिल्पाची निर्मिती ‘तरूणाई फांऊडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. एनामॉर्फिक स्कल्प्चर किंवा इल्युजन आर्ट प्रकारातील एकमेव असलेल्या गांधीजींच्या शिल्पाचे तरुणाईने दर्शन घेतले. तसेच सामुदायिक प्रार्थना केली
व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1365018570591240