भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वरणगाव येथे एका तरुणीने राहत्या घरात विषारी औषध घेतले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना शनिवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०. ३० वाजता तिचा मृत्यू झाला आहे. ख़ुशी चिंधू चांदणे (वय १९, रा. वरणगाव ता. भुसावळ) असे मयत तरुणीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की खुशी चांदणे हे तरुणी आपल्या आई, वडील, काका यांच्यासह ती राहत होती. तिचे शिक्षण सुरु असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास खुशीने राहत्या घरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.
तेथून तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. प्रसंगी पोलिसांनी घटनेची माहिती जाणून घेतली. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.