Home क्राईम भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणी जखमी

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणी जखमी


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव-धुळे रोडवरील भोरस शिवारात एका भरधाव कारने दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकी चालवणारी २४ वर्षीय तरुणी जखमी झाली असून, अपघात केल्यानंतर कार चालक गाडीसह पळून गेला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील भऊर गावात राहणारी शुभांगी कैलास केदार ही तरूणी २८ जानेवारी रोजी संध्याकाळी ५:१७ वाजता तिच्या ज्युपीटर गाडीने (MH 52 D 1623) जात होती. गायत्री पेट्रोल पंपासमोर एका अज्ञात कार चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून शुभांगीच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे शुभांगी रस्त्यावर फेकली गेल्याने तिच्या हातापायाला गंभीर मुका मार लागला आहे. या अपघातात ज्युपीटर गाडीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून टेल लाईट, मडगार्ड आणि इंडिकेटर तुटले आहेत. घटनेची माहिती न देता पळून गेला. याप्रकरणी शुभांगली केदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील चालकावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रवीण सपकाळे करत आहेत.


Protected Content

Play sound