भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील शांतीनगर परिसरातून तरुणाची दुचाकी लांबवल्याची घटना ३० मार्च रोजी रोजी उघडकीला आली आहे. या प्रकरणी चौकशी अंती शुक्रवार १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर अशोक चव्हाण वय-३६, रा. शांतीनगर भुसावळ हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच्याकडे त्याची दुचाकी (एमएच १९ बीए ७६७५ ) हे राहत असलेले अपार्टमेंटच्या ठिकाणी पार्किंगला लावली होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याचे ३० मार्च रोजी दुपारी तीन वाजता उघडकीला आले. त्यांनी त्याच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्याची दुचाकी मिळाली नाही. अखेर शुक्रवार १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास बाविस्कर हे करीत आहे.