Home क्राईम राहत्या घरात तरूणाने घेतला टोकाचा निर्णय; नातेवाईकांचा आक्रोश !

राहत्या घरात तरूणाने घेतला टोकाचा निर्णय; नातेवाईकांचा आक्रोश !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी येथे राहणाऱ्या तरूणाने राहत्या घराच्या वरच्य मजल्यावर गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंकज जगन सपकाळे वय ३० रा. खेडी ता.जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी गावात पंकज सपकाळे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. फायनान्स कंपनीत काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. सायंकाळी आईवडील हे खालच्या खोलीत बसलेले असतांना पंकज सपकाळे याने वरच्या खोलीत जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार समोर आल्यानंतर नातेवाईकांनी त्याला खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश वंजारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound