Home क्राईम दारूच्या नशेत डोक्यात लोखंडी पट्टी मारल्याने तरूण गंभीर !

दारूच्या नशेत डोक्यात लोखंडी पट्टी मारल्याने तरूण गंभीर !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावातील मारूती मंदीराजवळ काहीही कारण नसतांना दारूच्या नशेत येवून एका तरूणाला शिवीगाळ करत लोखंडी पट्टी डोक्यात टाकून गंभीर जखमी करत त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना रविवारी ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात प्रदीप घनश्याम पाटील वय २५ हा तरूण वास्तव्याला आहे. रविवारी ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास प्रदीप पाटील हा गावातील मारूती मंदीराजवळ असतांना संशयित आरोपी नितीन उर्फ पपई जगन पाटील हा दारूच्या नशेत येवून प्रदीप पाटील यांला काहीही कारण नसतांना शिवीगाळ केली. त्यानंतर हातातील लोखंडी पट्टी प्रदीपच्या डोक्यात टाकून त्याला जखमी केले. त्यानंतर “तुला जास्त झाले आहे, आता तुझा कार्यक्रमच लावतो” अशी धमकी दिली. या घटनेत प्रदीप पाटील याचा मोबाईल गहाळ झाला. याप्रकरणी प्रदीप पाटील याने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणारा संशयित आरोपी नितीन जगन पाटील याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound