रावेर प्रतिनिधी । शहरातील २७ वर्षीय तरूणाने निंभोरा सिम येथील तापी नदी उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीला आला आहे. तिसऱ्या दिवशी शेमळदे गावाजवळ तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील सतीष रमेश महाजन (वय-२७) या तरूणाने रविवार ५ सप्टेंबर रोजी निंभोरासीम येथील तापी नदीच्या पुलावरील रात्री उडी घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याचा मृतदेहाचा शोध घेण्यात आला होता परंतू आढळून आला नव्हता. आज तालुक्यातील शेमळदे गावाजवळ मयताचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी पोलीसांत नोंद घेण्याचे काम सुरू होते.