पाचोरा प्रतिनीधी । शहरातील जनता वसाहत भागातील ४२ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील संदिप भास्कर सोनवणे (वय – ४२) हा आपल्या आई, बहिण व दोन भावासह वास्तव्यास होता. घराच्या वरच्या मजल्यावर संदिप हा स्वतंञ राहत होता. दि. ९ रोजी राञी जेवण करून वरच्या मजल्यावरिल रूममध्ये तो झोपण्यास गेला. आज दि. १० रोजी सकाळी उशिर झाला तरी तो खाली आला नाही म्हणुन त्याला पाहण्यासाठी घरातील मंडळी गेली असता संदिप याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
संदिप यास तात्काळ पाचोरा ग्रामिण रूग्णालयात आणले असता त्यास ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला डाॅ. अमित साळुंखे यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदिप याचे आत्महत्ये मागील कारण समजु शकले नाही. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिपक सुरवाडे हे करित आहे