Home क्राईम विजेच्या धक्क्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू !

विजेच्या धक्क्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू !


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद येथील एका २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना विद्युत धक्क्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रामचंद्र सुरेश महाजन असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे अडावद परिसरासह संपूर्ण तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र महाजन हे सोमवारी, २ फेब्रुवारी रोजी दुपारी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास काम करत असताना त्यांना अचानक जोराचा विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे ते जागीच कोसळले. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती पाटील यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेबाबत अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ भरत नाईक हे करीत आहे.


Protected Content

Play sound